Posts

Showing posts from May, 2020

नवीन भाषा शिकताना

          "अगं, तुझ्या आईला काय म्हणालीस तू आता?", "आमची तक्रार केलीस ना?" आणि अर्थात "तुझी भाषा शिकव ना आम्हाला!"           हे आणि असे भरपूर प्रश्न नेहमीच माझ्या कानावर पडतात. आता तर असं काही ऐकू आला नाही तर मला कसंसच होतं.           माझी मातृभाषा तेलुगू. पण मुळात जन्म आणि आत्तापर्यंतचे आयुष्य महाराष्ट्रात राहिल्यामुळे व मराठी माध्यमाच्या शाळेत असल्याने मराठी मला मुखोद्गतच होती. पण म्हणून तेलुगू येत नाही असे नाही. पण मी माझ्या भाषेत बोलताना आजूबाजूला हसण्याचे आणि विनोदी असे येणारे आवाज अजूनही त्रास देतात.           तसं पाहिलं तर भाषा हे आपला संदेश समोरच्या व्यक्ती किंवा समुदायापर्यंत पोहोचवण्याचे अगदी प्रगत माध्यम. केवळ लहान मुलंच नव्हे तर आदिमानवापासून सर्वच सुरूवातीला इशारे, क्रिया, हालचाली व कृतींद्वारे संवाद साधतात. पूर्वी माणूस कदाचित आकृती मधून बोलत असावा. याची प्रचिती आपल्याला गुहाचित्रांतून येतेच. त्याप्रमाणेच लहान मूल रडून आणि डोळ्यांद्वारे संवाद साधते. म्हणतात ना, 'माणसाचे...