Posts

Showing posts from July, 2020

वेध 'स्वत:'चा

अपना टाईम आएगा! लॉकडाऊन असताना नित्यनेमाने १५ जूनला माझी शाळा ऑनलाईन तासिका घेणार हे समजल्यावर ही ओळ काही माझा पिच्छा सोडायला तयार नाही.‌ याचे कारण म्हणजे माझ्यापासून दुरावलेला 'तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना' असा रेल्वेप्रवास आणि जे आता दुसरं घर बनले आहे त्या महाविद्यालयाच्या आवारात नव्या आठवणी निर्माण करण्यासाठी आतुर झालेले माझे मन!  मनाचा थांगपत्ता लागत नाही, ते खरेच! या काळात ते मला प्रकर्षाने जाणवले. दिनक्रमाची तर पुरती बोंब लागली आहे. पण दिनचर्या चुकली म्हणजे जीवन चुकते असे नाही ही बाब देखील मला या‌ काळातच जाणवली. आता काय करायचे? आपला वेळ कसा घालवावा? या विचारांनी सुन्न होणार्या मनाची जागा नवीन काहीतरी करावे ही कल्पना कधी व्यापून टाकेल ते मला आजतागायत उमगले नाही. चंचल मनाची ही घालमेल रोज सतावते. परंतु तीच या त्रासावरचे औषधसुध्दा बनते. हे औषध म्हणजे मी स्वतःचा नव्याने घेतलेला शोध! ऑनलाईनच्या विळख्यात आज आपण स्वतःला असे काही जखडून घेतले आहे की त्याला कुठेतरी ब्रेक मारणे गरजेचे होते. आपल्याला मिळालेली अनिश्चित सुट्टी ही गोष्ट प्रकर्षाने आपल्या दृष्टीस आणते. म्हणूनच नकळत...