खिडकीबाहेर डोकावताना
माणूस सातत्याने शिकत असतो असे आपण नेहमी म्हणतो. पण शिकण्याची सार्थकता कितपत दिसून येते हा आजकालचा चर्चेचा मुद्दा बनला आहे. आपल्या आजूबाजूला घडणार्या घटना बघताना व त्यावरील पिढीजात चालत येणारी टिपणी ऐकताना 'सुशिक्षित वर्गाचे अशैक्षणिकत्व' ही उपमा खरी ठरताना दिसते. ट्रेनच्या प्रवासात असे किस्से सर्रास दिसून येतात. काही दिवसांपूर्वीची गोष्ट, ट्रेनमध्ये काही तृतीयपंथी चढले. (समानतेचे मूल्य स्वीकारून देखील आपण आजही लोकांना प्रथम-द्वितीय-तृतीय अशा क्रमवारीत विभागतो याचे कुतूहल वाटते) सकाळची गर्दीची वेळ आणि जोडीला गाडी उशिरा आली म्हणून प्रवाशांची होणारी अस्वस्थता. या सगळ्यात अनेक गोष्टी कारणीभूत असतानाही first classच्या लहान डब्यात गर्दी होण्याचे कारण ठरले सोबत असलेले हे सहप्रवासी. गाडीच्या प्रथम दर्जाच्या डब्यात प्रवास करण्यासाठी लागणारे योग्य ते तिकीट असून सुद्धा केवळ त्या व्यक्ती 'समाजाच्या तराजूत समान मोलाच्या नाहीत', या मानसिकतेने सर्वांच्या वक्र नजरा त्यांनाच दूषणे देत होत्या. कायदेमंडळाच्या तरतुदी आणि कागदोपत्री न्याय हक्क मिळवून देतात; परंतू हे हक्क बजावण्याचे स्वातं...