Posts

Showing posts from October, 2025

म्हातारपणातील बालपण अनुभवताना

म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण, हे वाक्य मी अनेकदा, अनेकांच्या बाबतीत, अनेकांच्या तोंडून ऐकलं आहे. स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या आजी-आजोबांना शेवटच्या श्वासापर्यंत पाठीचा कणा ताठ ठेवून वावरताना तसेच दात निखळले म्हणून आपला शब्द समोरच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतांना पाहिले आहे. Paralysisच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या आजोबांचा प्रवास ऐकला तर याच रोगामुळे खाट अंगाशी कवटाळलेल्या आजीला लेक, जावई व नातवंडांना डोळे भरून बघताना पाहिलं. आपल्या आजी-आजोबांच्या पाठीशी त्यांची मुलं जिवाच्या आकांताने त्यांचा सांभाळ करत होती हे जाणवल्याने आपल्या माणसांच्या सहवासाची गरज आणि त्यांचे महत्व कायम अधोरेखित होत राहिले आहे.  पालकांच्या तोंडून हे अनुभव ऐकत असताना वृद्धाश्रमांची वाढती संख्या, तिकडे दाखल होणारे किंबहुना बर्‍याचदा दाखल केल्या जाणाऱ्या वयोवृद्धांमध्ये आपल्या ओळखीतील व्यक्ती आहेत म्हणून वाईट वाटणारे विरोधाभासी प्रसंग मांडले जातात. काही प्रसंगी गरज म्हणून तर कित्येकदा वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्याची इच्छा नसणारे अपत्य वृद्धाश्रमाकडे धाव घेतात. ज्यांनी बोट धरून चालवायला शिकवले, निर्मळ मनाला व...