Posts

Showing posts from May, 2026

हवेहवेसे वाटणारे वेंधळेपण: स्वत्व साधण्याचे आपलेपण

Image
"अगं कार्तिकी, पाऊस ओसरला, जमीन सुकून कोरडी झाली आणि तुझी कॉफीसुद्धा गार झाली! कुठे हरवलीस?" डोक्यात माजलेले विचारांचे काहूर शमवताना बाबांच्या हाकेने तंद्री सुटली आणि मी भानावर आले. त्या दिवशी अचानक सकाळी पाऊस पडला. तसे आजकाल कोणत्याही ऋतूला कधीही दर्शन देण्याची सवय झाली आहे. पण वैशाखाच्या रखरखत्या उन्हात घामाने ओलेचिंब झालेल्या चेहर्‍यावर पावसाचे पाणी पडले आणि विचारांचा दुष्काळ सरून आनंदाचा पूर आला. त्या नादात मी दुसर्‍या जगात पोहोचले; असे जग जिथे माझ्यासोबत होते माझे शब्द, माझ्या कल्पना आणि माझे शब्दांगण! अशा स्वतःसाठी नकळत दिल्या जाणार्‍या वेळेत मला मी नव्याने उलगडताना जाणवते.  कधीतरी शांत बसून स्वतःच्या विचारांचे पिसारे फुलवताना मला माझीच एक नवी ओळख पटते. ही ओळख जगाने दिलेल्या व्याख्येपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. जगासाठी मी विशीतली, करिअरच्या शर्यतीत धावणारी, शहाणपणा, समजूतदारी, सामंजस्य आणि जबाबदारीचे धडे गिरवणारी तरुणी असेन; पण माझ्या आत अजूनही एक अल्लड, खट्याळ, 'बोम्मरिल्लू'मध्ये (अर्थात भातुकली) रमणारी मुलगी जिवंत आहे. या जगाला लोक कदाचित वेंधळेपण म्हणतील, पण मा...