Posts

Showing posts from February, 2021

माझं आवडतं पात्र

Image
  थांब! तुला शिकविण चांगला धडा! तुझ्या पापांचा भरलाय घडा... मराठी साहित्य आणि मराठी वाड्मयावर या ओळीने पाडलेली छाप काही औरच आहे! ही ओळ जिच्या ओठी शोभून दिसते त्या फुलराणीबद्दल बोलावे तितके कमीच. फुलं आणि गजरे विकून उदरनिर्वाह करणारी मंजुळा जिने फ्लोरिस्टाच्या शाॅपातल्या बाईसारखे बनण्याचे स्वप्न पाहिले तिला एक आदर्श म्हणून संबोधले तर त्यात काही वावगे ठरणार नाही! रस्त्यावर वणवण भटकणारी एखादी बाई जिच्या भाषेला ताल नाही आणि जीवनाला लय नाही, अशा व्यक्तीला आदर्श म्हणून संबोधले तर साहजिकच प्रत्येकाच्या कपाळावर पडलेल्या आठ्या आणि चेहर्यावर वाजलेले बारा कधी दिसेनासे होतील ते सांगता येणार नाही. याला कारण म्हणजे आपली विचारसरणी! अर्थात आपली विचारसरणी काही कमजोर नाही किंवा तिच्यात कोणतीही कमतरता देखील नाही. नीटनेटकेपणा हा उत्तम व्यक्तिमत्त्वाचा कणा असतोच...पण म्हणून एखाद्याचे अस्तित्व नाकारणे आणि आहे तसे किंबहुना अंशात्मक अस्तित्व डिवचण्याचा हक्क आपल्याला कोणी दिला? पु.‌ ल. म्हणजेच आपल्या लाडक्या पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी रेखाटलेली फुलराणी आणि तिचा मंजुळा बनण्याचा प्रवास वाचताना वर प्रक...