आठवणींच्या राज्यात
"अगं कार्तिकी काय झालय एवढं हसायला",आईचा आवाज आला आणि मी भानावर आले. आज अचानक मी लहानपणी एकदा पडले तो किस्सा आठवला. आणि दुसऱ्या क्षणी डोक्यात काहीतरी वेगळाच विचार...तो सुध्दा एक किस्साच...भाषेच्या गमतीचा...मराठी भाषा आहेच केवढी समृध्द ; सावरकरांंसारख्या थोरामोठ्यांचा वारसा लाभलेली! माय मराठी जेवढी समृध्द आहे तेवढीच गमतीशीर देखील. ही गंमत बोलताना कायम दिसून येते. एखाद्याने चुकून साडी घातली म्हटलं तरी आपण खळखळून हसतो. मग बाजूने एक आवाज येतो ,"अरे साडी घालत नाही , साडी नेसतात". अशावेळी दोन्ही वक्ते आनंदी होतात. पहिला आपल्यामुळे कोणीतरी हसले म्हणून(वक्ता आपली चूक मान्य करत नाही ही गोष्ट वेगळीच). आणि दुसरा आपण एखाद्याला ज्ञान दिले म्हणून आनंदून जातो(हेतू टोमणा मारण्याचा असेल तर ते त्या व्यक्तीलाच ठाऊक). हा आनंद काही क्षणांचा असतो पण स्मरणीय आठवण बनून जातो. अशा अनेक आठवणींचा संच असतो प्रत्येकाच्या आयुष्यात. आठवणी ह्या आपल्या मनाचा अविभाज्य भाग असतात. काही गोड असतात तर काही कटू. कटू आठवणींनी रडू ये...