एक नवी वाटचाल
२०-२० क्रिकेटची मॅच बघत आपण २०२०च्या वर्षात पोहोचून आणखी एका ग्रेगरियन दशकपूर्तीकडे कधी वळलो, हे लक्षात आले नाही. १ जानेवारी २०२०च्या सकाळी नव्या उमेदीने सर्वजण नवक्षितीजाची गवसणी घालण्याच्या प्रयत्नात असतानाच काळाच्या उदरात काहीतरी वेगळेच दडले होते..... शेवटी कॉलेज सुरू झाले. आता कुठे माझ्या महिनोंमहिने निश्चल पडलेल्या जीवनाची गाडी पूर्वपदावर येणार होती. आजची सकाळ नावीन्याने भरून गेली आणि याच सकारात्मकतेची सोबत घेऊन मी घराबाहेर पडले. स्टेशनवर पोहोचल्यावर माझी मैत्रीण दिसली. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही एकमेकींना बिलगलो. अचानक माझे डोळे उघडले. काळीज धस्सं झालं होतं! मनात भीतीचे ठोके धडाधड वाजत होते. काहीच सुचेनासे झाले. भानावर आले तेव्हा समजलं, मी स्वप्नात होते. या स्वप्नाची भीती का वाटावी याचं आश्चर्य वाचकांना नक्कीच वाटणार नाही. कारण संपूर्ण जग आज काळाच्या उदरात दडलेल्या अशा परिस्थितीच्या विळख्यात सापडले आहे ज्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सामाजिक अंतरीकरणाचे धडे गाठीशी घ्यावे लागले आहे. माणसापासून दुरावा राखणं हाच जीवनच मंत्र बनला आहे. हा विळखा म्हणजे कोरोना नामक व...