Posts

Assent, Dissent, Present: Questions beyond a Question Paper

For days, this piece remained unwritten. Not because there were no opinions, but because every passing day kept expanding my horizon of thoughts. What began as an examination controversy gradually unfolded into debates over government, institutions, Parliament, political platforms, media coverage and role of citizens of India. The emergence of new platforms such as CJP brought together diverse agendas, aspirations and political narratives. Every new development seemed to answer one question while raising several more. One question, however, stayed with me throughout. Why only NEET? India's examination system has been facing criticism for so long. Paper leaks, irregularities and allegations surrounding examination bodies are not new. Aspirants focusing on government employment have repeatedly experienced uncertainty. Then what transformed this particular issue into a nationwide political moment? Perhaps there is no single answer. But somewhere along the way, I realized that what beg...

हवेहवेसे वाटणारे वेंधळेपण: स्वत्व साधण्याचे आपलेपण

Image
"अगं कार्तिकी, पाऊस ओसरला, जमीन सुकून कोरडी झाली आणि तुझी कॉफीसुद्धा गार झाली! कुठे हरवलीस?" डोक्यात माजलेले विचारांचे काहूर शमवताना बाबांच्या हाकेने तंद्री सुटली आणि मी भानावर आले. त्या दिवशी अचानक सकाळी पाऊस पडला. तसे आजकाल कोणत्याही ऋतूला कधीही दर्शन देण्याची सवय झाली आहे. पण वैशाखाच्या रखरखत्या उन्हात घामाने ओलेचिंब झालेल्या चेहर्‍यावर पावसाचे पाणी पडले आणि विचारांचा दुष्काळ सरून आनंदाचा पूर आला. त्या नादात मी दुसर्‍या जगात पोहोचले; असे जग जिथे माझ्यासोबत होते माझे शब्द, माझ्या कल्पना आणि माझे शब्दांगण! अशा स्वतःसाठी नकळत दिल्या जाणार्‍या वेळेत मला मी नव्याने उलगडताना जाणवते.  कधीतरी शांत बसून स्वतःच्या विचारांचे पिसारे फुलवताना मला माझीच एक नवी ओळख पटते. ही ओळख जगाने दिलेल्या व्याख्येपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. जगासाठी मी विशीतली, करिअरच्या शर्यतीत धावणारी, शहाणपणा, समजूतदारी, सामंजस्य आणि जबाबदारीचे धडे गिरवणारी तरुणी असेन; पण माझ्या आत अजूनही एक अल्लड, खट्याळ, 'बोम्मरिल्लू'मध्ये (अर्थात भातुकली) रमणारी मुलगी जिवंत आहे. या जगाला लोक कदाचित वेंधळेपण म्हणतील, पण मा...

पानांमध्ये दडलेला सुवास अनुभवताना...

शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत वह्यापुस्तकांचा कप्पा आवरणे म्हणजे आठवणी, गंमतजंमत, पेन-पेन्सिलचे संच या निकषांच्या आधारावर सरत्या वर्षाचा आलेख रेखाटण्याचा कार्यक्रम असायचा. शाळा संपली तशी खाकी कव्हर घातलेल्या वह्यांची जागा printouts, highlighters, sticky notes यांनी घेतली. या प्रवासात जास्त वेळ लागतो तो पुस्तकांचा कप्पा आवरताना. त्या गराड्यात एकदा शिरले की बाहेर येण्यास मन मानत नाही. पुस्तकांसमवेत भरणारी सभा मन मोहून टाकते. कागदाच्या जंगलातून येणारा सुगंध प्रत्येकवेळी तितक्याच ओढीने स्वतःकडे आकर्षून घेतो.  तशी माझ्याकडे bookshelf लागेल एवढी पुस्तके नाहीत. जी आहेत त्यांचा गंध मन प्रफुल्लित करतो. काही पुस्तके वारंवार वाचली आणि काही निव्वळ सुशोभीकरणासाठी आणल्यासारखी वाटतात. पुस्तके म्हणजे विचार आणि दृष्टीसाठी मेजवानी; मग त्याला सुगंधाची जोड का असते हा प्रश्न कित्येकदा सतावतो.  वैज्ञानिकदृष्ट्या कागदांमधून येणारा वास म्हणजे लिग्निनची जादू. एक वाचक म्हणून विचार केला तर पुस्तकांच्या प्रत्येक पानातून येणारा सुवास म्हणजे पहिल्या पावसात चिंब भिजलेल्या मातीच्या मृद्‌गंधासमानच! मृद्‌...

मतदान कक्षातील बाकावरून

"आजी, पिवळ्या रंगातील एक आणि गुलाबी रंगातील एक असे दोन बटण दाबा."  १५ जानेवारी २०२६ रोजी ही सूचना ऐकत माझा दिवस सरला. प्रत्येक वेळी एक बटण दाबून बीप ऐकण्याची सवय असलेल्या अनेक मतदारांसाठी हा नवा प्रकार गोंधळात टाकणारा होता. ज्यांना या प्रक्रियेची माहिती होती त्यांनी लोकशाहीच्या प्रात्यक्षिकामध्ये सहज आपला सहभाग नोंदवला. ज्यांना पुरेशी माहिती नव्हती त्यांनी वरील सूचनेप्रमाणे बीप वाजेपर्यंत थांबून आपली उपस्थिती नोंदवली. या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहताना शाळा व महाविद्यालयातील नागरिकशास्त्र व राज्यशास्त्राच्या पुस्तकांतील संकल्पना प्रत्यक्षात उतरलेली दिसत होती. भारतीय संविधानाने राज्य धोरणाच्या निर्देशक तत्त्वांनुसार (Directive Principles of State Policy) कलम ४० द्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया रोवला. १९९२ च्या ७४व्या घटना दुरुस्तीने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला आणि संविधानाच्या २४३ZA कलमान्वये राज्य निवडणूक आयोगाच्या स्थापनेमुळे स्थानिक निवडणुकांना बळकटी मिळाली. लोकशाहीचा सहभाग देशाच्या तळागाळापर्यंत पोहोचावा, हा या सगळ्या रचनेमागचा हेतू आहे; पण प्र...

म्हातारपणातील बालपण अनुभवताना

म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण, हे वाक्य मी अनेकदा, अनेकांच्या बाबतीत, अनेकांच्या तोंडून ऐकलं आहे. स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या आजी-आजोबांना शेवटच्या श्वासापर्यंत पाठीचा कणा ताठ ठेवून वावरताना तसेच दात निखळले म्हणून आपला शब्द समोरच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतांना पाहिले आहे. Paralysisच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या आजोबांचा प्रवास ऐकला तर याच रोगामुळे खाट अंगाशी कवटाळलेल्या आजीला लेक, जावई व नातवंडांना डोळे भरून बघताना पाहिलं. आपल्या आजी-आजोबांच्या पाठीशी त्यांची मुलं जिवाच्या आकांताने त्यांचा सांभाळ करत होती हे जाणवल्याने आपल्या माणसांच्या सहवासाची गरज आणि त्यांचे महत्व कायम अधोरेखित होत राहिले आहे.  पालकांच्या तोंडून हे अनुभव ऐकत असताना वृद्धाश्रमांची वाढती संख्या, तिकडे दाखल होणारे किंबहुना बर्‍याचदा दाखल केल्या जाणाऱ्या वयोवृद्धांमध्ये आपल्या ओळखीतील व्यक्ती आहेत म्हणून वाईट वाटणारे विरोधाभासी प्रसंग मांडले जातात. काही प्रसंगी गरज म्हणून तर कित्येकदा वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्याची इच्छा नसणारे अपत्य वृद्धाश्रमाकडे धाव घेतात. ज्यांनी बोट धरून चालवायला शिकवले, निर्मळ मनाला व...

राजकीय सदनाच्या आवारात वावरताना...

प्रत्येक गोष्टीचा शेवट हा गोड असतो आणि तो गोड नसेल तर तो शेवट नसतो, असं मी बरेचदा ऐकलंय. पण प्रत्येक शेवट हा शेवटच असेल हे कसं ठरतं? एखाद्या प्रसंगाचा शेवट ही एखादी नवीन सुरुवात देखील असू शकते. Graduation हा शिक्षणाचा शेवटचा टप्पा असेल हे ठरवताना Post-graduation च्या माध्यमातून पुढील शिक्षणाची वाटचाल मुंबई विद्यापीठाच्या फिरोझशाह मेहता भवनाच्या प्रांगणात सुरू झाली. आणि इथूनच एक नवा प्रवास सुरू झाला. आतापर्यंत समवयस्क सवंगड्यांसोबत शिकत असताना आलेला अनुभव विविधांगी क्षेत्रांतून Political Scienceच्या क्षेत्रात आलेल्या सवंगड्यांच्या बाबतीत नक्कीच वेगळा ठरणार होता. इकडे कोणी विषयाची आवड म्हणून तर कोणी त्याच विषयात पुढचे शिक्षण घेण्यासाठी येतो.  विद्यापीठाच्या आवारातील सुंदर वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र विभागात M.A. साठी admission घेतल्यावर विज्ञानाच्या प्रयोगशाळेत practicals मधून Science समजून घेता येते तसेच राज्यशास्त्रामध्ये दडलेले शास्त्र practicalsच्या रूपात अनुभवण्याची इच्छा होती. Graduationच्या शेवटाकडे येताना Post-graduationचा घेतलेला निर्णय एक नवा...

Algorithm च्या जगात

काल सकाळी फोन पाहिला तर वॉलपेपर पासून सगळीकडेच मैत्री दिनाचे photos, posts आणि status. इतकंच काय तर सार्वजनिक वाहतुकीची माहिती देणार्‍या m-indicator या aap कडून सुद्धा 'Happy Friendship Day' असा संदेश आला. तंत्रज्ञानाचा fast and furious पणा लक्षात यायला किंचितही अवधी लागला नाही. मी इतर कोणाला मौखिक किंवा शाब्दिक शुभेच्छा देण्यापूर्वी virtual जगाने केव्हाच मला त्याच्या मैत्रीमध्ये स्थान दिले होते. समाज माध्यमांवर तर शुभेच्छांची रेलचेल दिवसभर एका अदृश्य स्पर्धेप्रमाणे जाणवली! WhatsApp status ला कोण किती photos टाकेल याची जणू चढाओढच सुरू होती. या सार्‍यामध्ये आठवणी, अनुभव आणि नात्यांची नव्याने सफर करता आली. अक्षरशः एका दिवसात अनेक वर्षांची दुनिया पाहून आल्यासारखे वाटले. प्रचलित अशा time machineच्या संशोधनाला आठवणींच्या गतीने कधीच बाजूला सारले होते. या सगळ्यात मौज, मजा, गंमत आणि आपलेपणा वाटला. काही काळ social media user असल्याचा फायदा जाणवला आणि दुसर्‍याच क्षणी वेगळाच विचार घोंगावू लागला.  सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार social media वर केलेल्या पोस्टवर कारवाई केली ...

खिडकीबाहेर डोकावताना

माणूस सातत्याने शिकत असतो असे आपण नेहमी म्हणतो. पण शिकण्याची सार्थकता कितपत दिसून येते हा आजकालचा चर्चेचा मुद्दा बनला आहे. आपल्या आजूबाजूला घडणार्‍या घटना बघताना व त्यावरील पिढीजात चालत येणारी टिपणी ऐकताना 'सुशिक्षित वर्गाचे अशैक्षणिकत्व' ही उपमा खरी ठरताना दिसते.  ट्रेनच्या प्रवासात असे किस्से सर्रास दिसून येतात. काही दिवसांपूर्वीची गोष्ट, ट्रेनमध्ये काही तृतीयपंथी चढले. (समानतेचे मूल्य स्वीकारून देखील आपण आजही लोकांना प्रथम-द्वितीय-तृतीय अशा क्रमवारीत विभागतो याचे कुतूहल वाटते) सकाळची गर्दीची वेळ आणि जोडीला गाडी उशिरा आली म्हणून प्रवाशांची होणारी अस्वस्थता. या सगळ्यात अनेक गोष्टी कारणीभूत असतानाही first classच्या लहान डब्यात गर्दी होण्याचे कारण ठरले सोबत असलेले हे सहप्रवासी. गाडीच्या प्रथम दर्जाच्या डब्यात प्रवास करण्यासाठी लागणारे योग्य ते तिकीट असून सुद्धा केवळ त्या व्यक्ती 'समाजाच्या तराजूत समान मोलाच्या नाहीत', या मानसिकतेने सर्वांच्या वक्र नजरा त्यांनाच दूषणे देत होत्या. कायदेमंडळाच्या तरतुदी आणि कागदोपत्री न्याय हक्क मिळवून देतात; परंतू हे हक्क बजावण्याचे स्वातं...

Xavier's: 'आजी' ते 'माजी'चा प्रवास!

Image
विद्यार्थीदशा म्हणजे 'गिली मिट्टी को साचे में ढालने का समय' असं मी एका videoमध्ये ऐकलं होतं. महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करताना आपल्या आयुष्याला आकार देण्याचे काम करणारा कुंभार बदलतो. आतापर्यंत घर, शाळा आणि मी या comfort zoneमध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या कोषातून बाहेर पडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःलाच स्वतःचा कुंभार बनावे लागते. त्याला साथ देण्यासाठी असणारे चाक देखील तोच निवडतो. हे चाक म्हणजे महाविद्यालय! असाच क्षण माझ्याही आयुष्यात आला आणि चाक निवडण्याच्या टप्प्यात मी यशस्वी ठरले, असेच म्हणेन. माझे हे चाक म्हणजे St. Xavier's College जिथे मी २०१७-२०२२ असा पाच वर्षांचा अविस्मरणीय काळ घालवला. College life म्हटलं की चित्रपटांच्या तथाकथित दुनियेनुसार निव्वळ टिंगलटवाळी करण्याचे स्थान हा संभ्रम आजही कित्येकजण बाळगतात. परंतु तो टप्पा पार करताना मौजमजेसोबत, शिक्षण आणि अनुभवाच्या धड्यांतून माणूस जगाला सामोरे जाण्यासाठी तयार होतो, हे नक्की!  १०वी नंतर पुढील शिक्षणासाठी शाखा व college निवडताना मला पहिली शिकवण मिळाली ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे! (पालकांची साथ हा वि...

बोम्मारिल्लू: एक नवा दृष्टिकोन

Image
दिवाळीच्या पहिल्या दिवशी माझ्या WhatsApp statusला असलेल्या एका फोटोने मला अनेकांशी virtual भेट घडवून दिली. कित्येक महिने बोलणे न झालेल्या लोकांचे मला समोरून मेसेज आले! जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि विसंवादाचा बांध फुटून नव्याने मैत्री खुलण्याची आशा निर्माण झाली. काही संदेश म्हणजे आठवणी तर काही म्हणजे प्रश्न....असे काही प्रश्न ज्यांनी माझी दिवाळी तेजोमय करण्यात भर घातली यात शंकाच नाही!  हा फोटो म्हणजे मी दिवाळीनिमित्त मांडलेलं बोम्मारिल्लू...म्हणजेच भातुकली जिला आपण इंग्रजीमध्ये Dollhouse म्हणतो. माझ्या फोटोमध्ये Doll नव्हती पण कदाचित तिची कमतरता कुठे जाणवली नाही. याच बोम्मारिल्लूच्या फोटोवरून कित्येक जणांनी मला मी आजही भातुकली खेळते का? आणि भातुकली का मांडून ठेवते असे प्रश्न विचारले...अर्थात माझ्या मैत्रिणीचं तर काय करू आणि काय नको असं काहीसं झाल्याचं सुद्धा माझ्या लक्षात आलं! हे प्रश्न यापूर्वीही मला अनेकांनी विचारले. पण यंदाच्या status replyने मला विचार करायला भाग पाडले. विचारांची ही शिदोरी मला सामाजिक शास्त्राच्या अभ्यासातून मिळाली हे सुद्धा खरंच!  खेळाला वयाचे बंधन नसते अ...