Posts

Showing posts from 2023

राजकीय सदनाच्या आवारात वावरताना...

प्रत्येक गोष्टीचा शेवट हा गोड असतो आणि तो गोड नसेल तर तो शेवट नसतो, असं मी बरेचदा ऐकलंय. पण प्रत्येक शेवट हा शेवटच असेल हे कसं ठरतं? एखाद्या प्रसंगाचा शेवट ही एखादी नवीन सुरुवात देखील असू शकते. Graduation हा शिक्षणाचा शेवटचा टप्पा असेल हे ठरवताना Post-graduation च्या माध्यमातून पुढील शिक्षणाची वाटचाल मुंबई विद्यापीठाच्या फिरोझशाह मेहता भवनाच्या प्रांगणात सुरू झाली. आणि इथूनच एक नवा प्रवास सुरू झाला. आतापर्यंत समवयस्क सवंगड्यांसोबत शिकत असताना आलेला अनुभव विविधांगी क्षेत्रांतून Political Scienceच्या क्षेत्रात आलेल्या सवंगड्यांच्या बाबतीत नक्कीच वेगळा ठरणार होता. इकडे कोणी विषयाची आवड म्हणून तर कोणी त्याच विषयात पुढचे शिक्षण घेण्यासाठी येतो.  विद्यापीठाच्या आवारातील सुंदर वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र विभागात M.A. साठी admission घेतल्यावर विज्ञानाच्या प्रयोगशाळेत practicals मधून Science समजून घेता येते तसेच राज्यशास्त्रामध्ये दडलेले शास्त्र practicalsच्या रूपात अनुभवण्याची इच्छा होती. Graduationच्या शेवटाकडे येताना Post-graduationचा घेतलेला निर्णय एक नवा...

Algorithm च्या जगात

काल सकाळी फोन पाहिला तर वॉलपेपर पासून सगळीकडेच मैत्री दिनाचे photos, posts आणि status. इतकंच काय तर सार्वजनिक वाहतुकीची माहिती देणार्‍या m-indicator या aap कडून सुद्धा 'Happy Friendship Day' असा संदेश आला. तंत्रज्ञानाचा fast and furious पणा लक्षात यायला किंचितही अवधी लागला नाही. मी इतर कोणाला मौखिक किंवा शाब्दिक शुभेच्छा देण्यापूर्वी virtual जगाने केव्हाच मला त्याच्या मैत्रीमध्ये स्थान दिले होते. समाज माध्यमांवर तर शुभेच्छांची रेलचेल दिवसभर एका अदृश्य स्पर्धेप्रमाणे जाणवली! WhatsApp status ला कोण किती photos टाकेल याची जणू चढाओढच सुरू होती. या सार्‍यामध्ये आठवणी, अनुभव आणि नात्यांची नव्याने सफर करता आली. अक्षरशः एका दिवसात अनेक वर्षांची दुनिया पाहून आल्यासारखे वाटले. प्रचलित अशा time machineच्या संशोधनाला आठवणींच्या गतीने कधीच बाजूला सारले होते. या सगळ्यात मौज, मजा, गंमत आणि आपलेपणा वाटला. काही काळ social media user असल्याचा फायदा जाणवला आणि दुसर्‍याच क्षणी वेगळाच विचार घोंगावू लागला.  सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार social media वर केलेल्या पोस्टवर कारवाई केली ...

खिडकीबाहेर डोकावताना

माणूस सातत्याने शिकत असतो असे आपण नेहमी म्हणतो. पण शिकण्याची सार्थकता कितपत दिसून येते हा आजकालचा चर्चेचा मुद्दा बनला आहे. आपल्या आजूबाजूला घडणार्‍या घटना बघताना व त्यावरील पिढीजात चालत येणारी टिपणी ऐकताना 'सुशिक्षित वर्गाचे अशैक्षणिकत्व' ही उपमा खरी ठरताना दिसते.  ट्रेनच्या प्रवासात असे किस्से सर्रास दिसून येतात. काही दिवसांपूर्वीची गोष्ट, ट्रेनमध्ये काही तृतीयपंथी चढले. (समानतेचे मूल्य स्वीकारून देखील आपण आजही लोकांना प्रथम-द्वितीय-तृतीय अशा क्रमवारीत विभागतो याचे कुतूहल वाटते) सकाळची गर्दीची वेळ आणि जोडीला गाडी उशिरा आली म्हणून प्रवाशांची होणारी अस्वस्थता. या सगळ्यात अनेक गोष्टी कारणीभूत असतानाही first classच्या लहान डब्यात गर्दी होण्याचे कारण ठरले सोबत असलेले हे सहप्रवासी. गाडीच्या प्रथम दर्जाच्या डब्यात प्रवास करण्यासाठी लागणारे योग्य ते तिकीट असून सुद्धा केवळ त्या व्यक्ती 'समाजाच्या तराजूत समान मोलाच्या नाहीत', या मानसिकतेने सर्वांच्या वक्र नजरा त्यांनाच दूषणे देत होत्या. कायदेमंडळाच्या तरतुदी आणि कागदोपत्री न्याय हक्क मिळवून देतात; परंतू हे हक्क बजावण्याचे स्वातं...