Posts

Showing posts from April, 2026

पानांमध्ये दडलेला सुवास अनुभवताना...

शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत वह्यापुस्तकांचा कप्पा आवरणे म्हणजे आठवणी, गंमतजंमत, पेन-पेन्सिलचे संच या निकषांच्या आधारावर सरत्या वर्षाचा आलेख रेखाटण्याचा कार्यक्रम असायचा. शाळा संपली तशी खाकी कव्हर घातलेल्या वह्यांची जागा printouts, highlighters, sticky notes यांनी घेतली. या प्रवासात जास्त वेळ लागतो तो पुस्तकांचा कप्पा आवरताना. त्या गराड्यात एकदा शिरले की बाहेर येण्यास मन मानत नाही. पुस्तकांसमवेत भरणारी सभा मन मोहून टाकते. कागदाच्या जंगलातून येणारा सुगंध प्रत्येकवेळी तितक्याच ओढीने स्वतःकडे आकर्षून घेतो.  तशी माझ्याकडे bookshelf लागेल एवढी पुस्तके नाहीत. जी आहेत त्यांचा गंध मन प्रफुल्लित करतो. काही पुस्तके वारंवार वाचली आणि काही निव्वळ सुशोभीकरणासाठी आणल्यासारखी वाटतात. पुस्तके म्हणजे विचार आणि दृष्टीसाठी मेजवानी; मग त्याला सुगंधाची जोड का असते हा प्रश्न कित्येकदा सतावतो.  वैज्ञानिकदृष्ट्या कागदांमधून येणारा वास म्हणजे लिग्निनची जादू. एक वाचक म्हणून विचार केला तर पुस्तकांच्या प्रत्येक पानातून येणारा सुवास म्हणजे पहिल्या पावसात चिंब भिजलेल्या मातीच्या मृद्‌गंधासमानच! मृद्‌...