Posts

Showing posts from 2019

आठवणींच्या राज्यात

         "अगं कार्तिकी काय झालय एवढं हसायला",आईचा आवाज आला आणि मी भानावर आले. आज अचानक मी लहानपणी एकदा पडले तो किस्सा आठवला. आणि दुसऱ्या क्षणी डोक्यात काहीतरी वेगळाच विचार...तो सुध्दा एक किस्साच...भाषेच्या गमतीचा...मराठी भाषा आहेच केवढी समृध्द ; सावरकरांंसारख्या थोरामोठ्यांचा वारसा लाभलेली! माय मराठी जेवढी समृध्द आहे तेवढीच गमतीशीर देखील. ही गंमत बोलताना कायम दिसून येते. एखाद्याने चुकून साडी घातली म्हटलं तरी आपण खळखळून हसतो. मग बाजूने एक आवाज येतो ,"अरे साडी  घालत नाही , साडी नेसतात". अशावेळी दोन्ही वक्ते आनंदी होतात. पहिला आपल्यामुळे कोणीतरी हसले म्हणून(वक्ता आपली चूक मान्य करत नाही ही गोष्ट वेगळीच). आणि दुसरा आपण एखाद्याला ज्ञान दिले म्हणून आनंदून जातो(हेतू टोमणा मारण्याचा असेल तर ते त्या व्यक्तीलाच ठाऊक). हा आनंद काही क्षणांचा असतो पण स्मरणीय आठवण बनून जातो.           अशा अनेक आठवणींचा संच असतो प्रत्येकाच्या आयुष्यात. आठवणी ह्या आपल्या मनाचा अविभाज्य भाग असतात. काही गोड असतात तर काही कटू. कटू आठवणींनी रडू ये...

डोंबिवली - सीएसएमटी - डोंबिवली

          सकाळी ८ची वेळ. पावसातून वाट काढत रेल्वे स्थानकावर पोहचून तिकीट काढले. प्रवास सुरु करण्यासाठी पुलावर चढताच दररोजप्रमाणे सकाळची आणि त्यातही डोंबिवलीची गर्दी मी पुन्हा नव्याने अनुभवत होते. प्लॅटफॉर्म क्रमांक ३वर आलेल्या गाडीमध्ये चढण्यासाठी लोकांनी केलेली घाई आणि त्यातून शांतपणे रस्ता काढणारी मी हे समीकरण वेगळेच होते. कारण एवढेच की तेव्हा मला गाडी पकडण्यापेक्षा स्वतःला सावरणे गरजेचे होते. हातातील छत्री, नुकतेच काढलेले जपून ठेवायचे तिकीट आणि ओले झालेले दप्तर व कपडे सांंभाळताना माझी त्रेधातिरपीट उडाली होती. माझी आवराआवर आटपायला आणि पुढील गाडी यायला एकच वेळ झाली. पूर्ण तयारीनिशी गर्दीतून गाडीत चढले आणि समाधानाचा निःश्वास सोडला.                     थोड्या वेळाने मला खिडकीची जागा मिळाली. खिडकीतून येणारा गार वारा आणि पावसाने बहरलेला हिरवागार निसर्ग यांनी तर मला कधीच दुसऱ्या विश्वात पोहचवले होते. तिथे होते ती फक्त मी आणि नीरव शांतता. अचानक बाजूने...