डोंबिवली - सीएसएमटी - डोंबिवली
सकाळी ८ची वेळ. पावसातून वाट काढत रेल्वे स्थानकावर पोहचून तिकीट काढले. प्रवास सुरु करण्यासाठी पुलावर चढताच दररोजप्रमाणे सकाळची आणि त्यातही डोंबिवलीची गर्दी मी पुन्हा नव्याने अनुभवत होते. प्लॅटफॉर्म क्रमांक ३वर आलेल्या गाडीमध्ये चढण्यासाठी लोकांनी केलेली घाई आणि त्यातून शांतपणे रस्ता काढणारी मी हे समीकरण वेगळेच होते. कारण एवढेच की तेव्हा मला गाडी पकडण्यापेक्षा स्वतःला सावरणे गरजेचे होते. हातातील छत्री, नुकतेच काढलेले जपून ठेवायचे तिकीट आणि ओले झालेले दप्तर व कपडे सांंभाळताना माझी त्रेधातिरपीट उडाली होती. माझी आवराआवर आटपायला आणि पुढील गाडी यायला एकच वेळ झाली. पूर्ण तयारीनिशी गर्दीतून गाडीत चढले आणि समाधानाचा निःश्वास सोडला. थोड्या वेळाने मला खिडकीची जागा मिळाली. खिडकीतून येणारा गार वारा आणि पावसाने बहरलेला हिरवागार निसर्ग यांनी तर मला कधीच दुसऱ्या विश्वात पोहचवले होते. तिथे होते ती फक्त मी आणि नीरव शांतता. अचानक बाजूने...