Posts

Showing posts from 2021

बोम्मारिल्लू: एक नवा दृष्टिकोन

Image
दिवाळीच्या पहिल्या दिवशी माझ्या WhatsApp statusला असलेल्या एका फोटोने मला अनेकांशी virtual भेट घडवून दिली. कित्येक महिने बोलणे न झालेल्या लोकांचे मला समोरून मेसेज आले! जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि विसंवादाचा बांध फुटून नव्याने मैत्री खुलण्याची आशा निर्माण झाली. काही संदेश म्हणजे आठवणी तर काही म्हणजे प्रश्न....असे काही प्रश्न ज्यांनी माझी दिवाळी तेजोमय करण्यात भर घातली यात शंकाच नाही!  हा फोटो म्हणजे मी दिवाळीनिमित्त मांडलेलं बोम्मारिल्लू...म्हणजेच भातुकली जिला आपण इंग्रजीमध्ये Dollhouse म्हणतो. माझ्या फोटोमध्ये Doll नव्हती पण कदाचित तिची कमतरता कुठे जाणवली नाही. याच बोम्मारिल्लूच्या फोटोवरून कित्येक जणांनी मला मी आजही भातुकली खेळते का? आणि भातुकली का मांडून ठेवते असे प्रश्न विचारले...अर्थात माझ्या मैत्रिणीचं तर काय करू आणि काय नको असं काहीसं झाल्याचं सुद्धा माझ्या लक्षात आलं! हे प्रश्न यापूर्वीही मला अनेकांनी विचारले. पण यंदाच्या status replyने मला विचार करायला भाग पाडले. विचारांची ही शिदोरी मला सामाजिक शास्त्राच्या अभ्यासातून मिळाली हे सुद्धा खरंच!  खेळाला वयाचे बंधन नसते अ...

Virtual Wishes

Hello, I hope you're doing well 😊 I hope the opening of my write-up has made you content! In today's world, the above mentioned sentence has become a way to ensure one's well-being. In my view it assures people about their invisible and emotional presence at the receiver's end and develops a sense of belonging. The recent phenomenon of 'New Normal' has acquired almost everything in our lives. It has dictated new ways of living and proposed different styles of presenting ourselves around the globe. Hence, I think the notion of wishing each other hasn’t left behind. 21 st century has seen technological development of emotions, views, opinions and feelings by providing a platform which has become negligible part of our lives today. It seems almost impossible to leave it as it makes one feel to be cut-off from the world that has become a destination of the journey of a single click. This development is none other than the top most trending platform known ...

माझं आवडतं पात्र

Image
  थांब! तुला शिकविण चांगला धडा! तुझ्या पापांचा भरलाय घडा... मराठी साहित्य आणि मराठी वाड्मयावर या ओळीने पाडलेली छाप काही औरच आहे! ही ओळ जिच्या ओठी शोभून दिसते त्या फुलराणीबद्दल बोलावे तितके कमीच. फुलं आणि गजरे विकून उदरनिर्वाह करणारी मंजुळा जिने फ्लोरिस्टाच्या शाॅपातल्या बाईसारखे बनण्याचे स्वप्न पाहिले तिला एक आदर्श म्हणून संबोधले तर त्यात काही वावगे ठरणार नाही! रस्त्यावर वणवण भटकणारी एखादी बाई जिच्या भाषेला ताल नाही आणि जीवनाला लय नाही, अशा व्यक्तीला आदर्श म्हणून संबोधले तर साहजिकच प्रत्येकाच्या कपाळावर पडलेल्या आठ्या आणि चेहर्यावर वाजलेले बारा कधी दिसेनासे होतील ते सांगता येणार नाही. याला कारण म्हणजे आपली विचारसरणी! अर्थात आपली विचारसरणी काही कमजोर नाही किंवा तिच्यात कोणतीही कमतरता देखील नाही. नीटनेटकेपणा हा उत्तम व्यक्तिमत्त्वाचा कणा असतोच...पण म्हणून एखाद्याचे अस्तित्व नाकारणे आणि आहे तसे किंबहुना अंशात्मक अस्तित्व डिवचण्याचा हक्क आपल्याला कोणी दिला? पु.‌ ल. म्हणजेच आपल्या लाडक्या पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी रेखाटलेली फुलराणी आणि तिचा मंजुळा बनण्याचा प्रवास वाचताना वर प्रक...

एक नवी वाटचाल

 २०-२० क्रिकेटची मॅच बघत आपण २०२०च्या वर्षात पोहोचून आणखी एका ग्रेगरियन दशकपूर्तीकडे कधी वळलो, हे लक्षात आले नाही. १ जानेवारी २०२०च्या सकाळी नव्या उमेदीने सर्वजण नवक्षितीजाची गवसणी घालण्याच्या प्रयत्नात असतानाच काळाच्या उदरात काहीतरी वेगळेच दडले होते..... शेवटी कॉलेज सुरू झाले. आता कुठे माझ्या महिनोंमहिने निश्चल पडलेल्या जीवनाची गाडी पूर्वपदावर येणार होती. आजची सकाळ नावीन्याने भरून गेली आणि याच सकारात्मकतेची सोबत घेऊन मी घराबाहेर पडले. स्टेशनवर पोहोचल्यावर माझी मैत्रीण दिसली. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही एकमेकींना बिलगलो. अचानक माझे डोळे उघडले. काळीज धस्सं झालं होतं! मनात भीतीचे ठोके धडाधड वाजत होते. काहीच सुचेनासे झाले. भानावर आले तेव्हा समजलं, मी स्वप्नात होते. या स्वप्नाची भीती का वाटावी याचं आश्चर्य वाचकांना नक्कीच वाटणार नाही. कारण संपूर्ण जग आज काळाच्या उदरात दडलेल्या अशा परिस्थितीच्या विळख्यात सापडले आहे ज्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सामाजिक अंतरीकरणाचे धडे गाठीशी घ्यावे लागले आहे. माणसापासून दुरावा राखणं हाच जीवनच मंत्र बनला आहे.  हा विळखा म्हणजे कोरोना नामक व...